Your Own Digital Platform

सुरूरजवळ हायवेवर अपघातभुईज: 
पुणे- बेंगलोर महामार्गावर सुरुर गावानजीक एका कारचा अपघात झाला. यामध्ये वसीम निसार शेख व अरफान नजिर शेख (दोघे रा.मीरा रोड,मुंबई) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, वसीम शेख व त्याचे तिन मित्र गोव्यावरून मुंबईला एमएच 04 बी.बी 1389 या कारमधून प्रवास करत होते. साताऱ्यातील सुरूर गावाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व रस्ताच्या बाजूला असणाऱ्या कठड्याला या कारची जोरदार धडक बसली. आणि कार रस्त्यावरच पलटी झाली. गाडीमध्ये असणारे फारुख शेख व आवेश शेख हे दोघे सुखरूप आहेत. सुरूर ग्रामस्थांनी मदतकार्य देऊन जखमींना सातारा येते पाठवले. भुईंज पोलीस स्टेशनचे स,पो,नि,बाळासाहेब भरणे हवालदार कोळी यांनी वाहतुक सुरळीत केली.