Your Own Digital Platform

'बालाजी'च्या जमिनीची सातबार्‍यावर नोंद न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा


भट्टड यांची लोकशाही दिनात तक्रारफलटण : शहरातील श्री बालाजी रामचंद्र देवस्थानच्या शेतजमिनीची सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांना सुमारे दहा महिन्यांपूर्वी दिले आहेत. अद्याप सातबार्‍यावर श्री बालाजी रामचंद्र देवस्थानचे नाव लागलेले नसल्याने रमाकांत मोतीलाल भट्टड यांनी लोकशाही दिनात तक्रार केली आहे.

याबाबत मारवाड पेठ (ता. फलटण) येथील रमाकांत मोतीलाल भट्टड यांनी लोकशाही दिनात तक्रार केली आहे.

भट्टड यांच्या तक्रारीनूसार, दि.30 जुलै 2010 अन्वये श्री बालाजी रामचंद्र देवस्थानच्या नावाची फलटणची मिळकत शेतजमिनीस सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी 16 नोव्हेंबर 2015 रोजी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार फलटण यांना दिले आहेत. त्यांनी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केली नसून त्यांनी जिल्ह्याधिकार्‍यांच्या आदेशाचा अवमान केला असून या आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी व संबंधित दोन्ही अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लोकशाही दिनात करण्यात केली आहे.