Your Own Digital Platform

दुष्काळ निधी घोटाळ्यातील तिसरा आरोपी जेरबंद


वडूज : दुष्काळ निधी घोटाळ्यातील नायडू या तिसऱ्या आरोपीस वडूज पोलिसांनी सातारा येथे अटक केली. पोलिस उपनिरीक्षक एस बी मदने यांनी राकेश मुन्नास्वामी नायडू (वय ३६) यांस ताब्यात घेतले आहे.

आज नायडू सातारा येथे आला असल्याची माहिती मिळाली होती . आज अटक पूर्व देण्यासाठी तारीख असताना कोर्टात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी कारवाई केली.