Your Own Digital Platform

सातारा शहर आणि त्रिशंकू भागात भुयारी गटर योजना राबवा : आ. शिवेंद्रसिंहराजे


सातारा- सातारा शहरालगत असलेल्या शाहूपूरी, शाहूनगर, पिरवाडी, विसावा नाका आदी परिसर नगर पालिका अथवा ग‘ामपंचायतीच्या हद्दीत नसल्याने या परिसराला अनेक समस्या भेडसावत असतात. सातारा शहराचा अमृत योजनेत समावेश असल्याने या योजनेतून शहरात भुयारी गटर योजना राबवावी. तसेच प्रस्तावित हद्दवाढीत त्रिशंकू भाग असल्याने या भागातही अमृत योजनेतून भुयारी गटर करण्यात यावीत अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली असून यासंदर्भात स्वर्हे करुन तसा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवा, अशा सुचना त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता आंटद यांना दिल्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जावून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिक्षक अभियंता आर. बी. आंटद यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक सौ. लिना गोरे, सौ. मनिषा काळोखे, सौ. दिपलक्ष्मी नाईक, शेखर मोरे- पाटील, बाळासाहेब खंदारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, राजू गोरे, विजय काळोखे आदी उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शहर आणि परिसरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि गळती यासंदर्भात आंटद यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
सातारा शहराची हद्दवाढ प्रस्तावित असून हद्दवाढीत शाहुपूरी, शाहूनगर, विसावा नाका हा शहरालगतचा भाग समाविष्ट आहे. आज ना उद्या हद्दवाढीला मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे अमृत योजनेतून सातारा शहर आणि त्रिशंकू भागात भुयारी गटर योजना राबवली गेली पाहिजे. शहराचा विस्तार पाहता हे काम होणे अत्यावश्यक आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. त्यामुळे सातारा शहरासह त्रिशंकू भागाचा सर्व्हे करुन भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवा, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आंटद यांना केली. तसेच प्रस्ताव मंजुरीसाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करु, असेही स्पष्ट केले. शाहूनगर, विसावा नाका आदी परिसरासाठी मंजूर असलेली नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने सुरु करण्याची सुचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आंटद यांना केली. गोडोली तळ्याच्या बांधकामानंतर उदभवतणार्‍या ड्रेनेज समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. ओढा बंद झाल्याने पावसाळ्यात पाणी साचून ते घरात आणि दुकानांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते. हा प्रकार थांबण्यासाठी प्राधिकरणाकडून उपाययोजना करण्यात यावी.
शहर आणि परिसरात प्राधिकरणामार्ङ्गत सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांना लागलेली गळती काढा. मु‘यमंत्री पेयजल योजनेमध्ये सातारा आणि जावली तालुक्यातील गावांचा समावेश करुन गावे पाणीटंचाईमुक्त करा. जावली तालुक्याला भेडसावणारा पाणी टंचाईचा प्रश्‍न सोडवण्यासाठी या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. तसेच शाहूपूरी पाणीपुवरठा योजनेचे रखडलेले काम तातडीने पुर्ण करा, अशा सुचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आंटद यांना केल्या. सर्व सुचनांसदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन आंटद यांनी यावेळी दिले.