दि. ११ डिसेंबर रोजी नागपूरला सुंबरान: मारुती जानकरसातारा: दिनांक ११ डिसेंबर रोजी धनगर आरक्षणच्या मागणीसाठी नागपूर येथे धनगर आरक्षणाच सुंबरान मांडले आहे. नागपूरला 'आया मल्हार'च्या नावाने सरकारला कानठळ्या बसविणार असल्याचे मल्हार क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मारुती जानकर यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते.

यावेळी मल्हार क्रांती संघटना खंडाळा अध्यक्ष अमोल मधुकर शेंडगे, खंडाळा तालुका उपाध्यक्ष संदीप भिमराव वाघमोडे, फलटण तालुका अध्यक्ष पांडुरंग शंकर कचरे, फलटण तालुका युवक अध्यक्ष सागर सुभाष खुसपे , खटाव तालुका अध्यक्ष सोमनाथ बाळू काळे, माण तालुका अध्यक्ष विशाल वाघमोडे, वाई तालुका अध्यक्ष तात्याबा ठोंबरे, सुजित हांडे, राहुल वाघमोडे, मिथुन कचरे, अण्णा शिंगाडे, सचिन कोकरे, सागर खुसपे यांची उपस्थिती होती.

जानकर म्हणाले, राजकीय दृष्ट्या धनगर समाज सक्षम होईल, याची भीती बाळगून जुन्या व नव्या सरकारने धनगरांना आरक्षणापासून लांब ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसात आरक्षण देऊ, असे निवडणुकीपूर्वी सांगितले होते. भाजपने आश्वासन दिले, ते पूर्ण करावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीप्रमाणे आम्हाला तुम्ही फसविणार आहात का? जर फसवत असाल तर आम्ही नागपूरला जाब विचारायला येतोय, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

महादेव जानकर सत्तेत अडकले. त्यांच्याबरोबर जायला आम्ही तयार आहोत. पण, त्यांनी आरक्षण मिळवून द्यावे. सहा महिने अजुन पाहणार आहे. वेळप्रसंगी त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आम्हाला आरक्षण द्यावं. कोणीही द्यावं. आम्हाला आरक्षण पाहिजे, असे मारुती जानकर यांनी सांगितले.

1 comment:

  1. आरक्षण आमच्या हक्काचं मागतोय।
    धनगर आरक्षण निर्धार पक्का।

    ReplyDelete

Powered by Blogger.