शेतकर्‍यांनमध्ये कर्जमाफीचा उत्साह


फलटण : :राज्य शासनाच्या छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत फलटण तालुक्यात 2 हजार 894 शेतकर्‍यांना 15 कोटी 36 लाख 88 हजारांची कर्जमाफी मंजूर झाली असून दुसर्‍या टप्प्यात आणखी काही शेतकर्‍यांना कर्जमाफी मंजूर होणार असल्याचे माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली.

राज्यातील 41 लाख थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेंतर्गत 19 हजार 537 कोटी मंजूर केले असून संबंधित बँकांना सविस्तर माहितीसह याद्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकांनी मंजूर रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार फलटण तालुक्यातील सातारा जिल्हा बँकेच्या 27 शाखांमधील 2894 शेतकर्‍यांना 15 कोटी 36 लाख 88 हजार रुपये कर्ज माफ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा बँकेच्या फलटण तालुक्यातील विडणी शाखेतील एकाही शेतकर्‍याला पहिल्या टप्प्यात कर्जमाफी प्राप्त झाली नाही. उर्वरीत शाखामधील कर्जमाफी मंजूर झालेल्या शेतकर्‍यांची संख्या आणि कंसात मंजूर कर्जमाफीची रक्कम : साखरवाडी 193 (112.71), गोखळी 63 (31.35), आसू 89 (52.04), गुणवरे 150 (95.18), तरडगांव 118 (68.05), मार्केटयार्ड फलटण 515 (277.71), दुधेबावी 161 (77.66), गिरवी 58 (33.58), आदर्की बुद्रुक 63 (27.56), सासवड 90 (60), वाखरी 213 (93.93), सांगवी 101 (52.81), राजाळे 131 (47.30), हिंगणगांव 123 (54.30), हणमंतवाडी 24 (17.80),

शिंदेनगर 26 (21.74), निरगुडी 65 (43.68), पाडेगांव 58 (29.45), बरड 71 (45.65), निंबळक 103 (51.74), काळज 113 (67.27), खुंटे 61 (33.77), जिंती 94 (36.76), तांबवे 52 (22.65), बिबी 68 (30.35), मुंजवडी 100 (51.82).दरम्यान, दै. पुढारीने ‘कर्जमाफीचा फायदा तालुक्यातील शेतकर्‍यांना कधी मिळणार? याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे संबंधित विभागाकडून कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती मिळाल्याच्या भावना अनेक शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या.

No comments

Powered by Blogger.