तामजाईनगरात भरदिवसा घरफोडी


सातारा : करंजे येथील तामजाईनगरात असणार्‍या रुद्राक्ष रेसिडेन्सीमधील डॉ. विकास कोठावदे यांचा फ्लॅट भरदिवसा फोडून चोरट्यांनी 7 तोळे वजनाचे दागिने आणि चांदीची भांडी असा सुमारे 2 लाखांचा ऐवज चोरून नेला. भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. कोठावदे हे रुद्राक्ष रेसिडेन्सीमध्ये पत्नी, आई व दोन मुलींसोबत राहतात. कोठावदे दाम्पत्य शेंद्रे येथील ऑन्को लाईफ सेंटरमध्ये नोकरीस आहेत. दि. 9 रोजी नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर रात्री 7.30 च्या सुमारास फ्लॅटवर परतले.

यावेळी त्यांना दाराचे कुलूप तुटल्याचे दिसले. घरात आल्यानंतर त्यांना आतील कपाटातील लॉकर उचकटल्याचे व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. चोरट्यांनी लॉकरमधील दागिने, भांडी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे आढळले. याबाबत गुन्हा दाखल असून तपास पोलिस उपनिरीक्षक भास्कर कदम करत आहेत.

No comments

Powered by Blogger.