‘कराड दौड’मधून राष्ट्रीय एकात्मता संदेश


कराड : बांगला मुक्‍ती संग्रामातील विजयोत्सवाच्या स्मृती कायम जपण्यासाठी येथे विजय दिवस समारोह सुरु असून शुक्रवारी त्यानिमित्ताने ‘कराड दौड’चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी काढण्यात आलेल्या या दौंडमध्ये कराडकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेतला.

कराड दौैडला दत्त चौकातून नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. निवृत कर्नल संभाजीराव पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, मुख्याधिकारी यशवंत डांगे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप जाधव, दि कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, उद्योजक सलीम मुजावर यांच्यासह नगरसेवक, शहर पोलिस ठाण्याचे निर्भया पथक, व विजय दिवसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समिती प्रमुख, नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सहभागी विद्यार्थी व तरुणांनी दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणुन गेला. दत्त चौकातुन आझाद चौक, चावडी चौक मार्गे कन्याशाळे समोरुन कृष्णा नाका मार्गे शिवाजी स्टेडीयम परिसरात दौड नेण्यात आली. तेथे दौडचा समारोप झाला. समारोहात शस्त्र प्रदर्शन तरुण-तरुणींचे आकर्षण ठरले. तरुणांचे आकर्षण असलेल्या सैन्यदलातील शस्त्रांचे प्रदर्शन येथील लिबर्टीच्या मैदानात भरवण्यात आले आहे. प्रदर्शनात लष्कर वापरत असलेली शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. ती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
विजय दिवस दौडमध्ये निर्भया पथकातील युवतींनी सहभाग नोंदवला यामध्ये वेणूताई चव्हाण कॉलेज, आनंदराव चव्हाण हायस्कूल, विठामाता हायस्कूल, महिला कॉलेजमधील विद्यार्थीनींचा सहभाग होता.

No comments

Powered by Blogger.