भाजप अनूसूचित जाती सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मिलिंद काकडे


सातारा: भारतीय जनता पक्षाच्या अनूसुचित जाती सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सातार्‍यातील नगरसेवक मिलींद काकडे यांची निवड करण्यात आली. जिल्हा प्रभारी व भाजपच्या नेत्या नीता केळकर आणि जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या हस्ते मिलींद काकडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, नगरसवेक धनंजय जांभळे, अ‍ॅड.प्रशांत खामकर, सिध्दी पवार, विजय काटवटे, शहराध्यक्ष सुनील काळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष असून सध्या देशात व केंद्रात सत्ता आहे. त्या उपयोग जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील रहावे, असे केळकर यांनी काकडे यांना सूचित केले. त्यावर, आपण अनूसुचित जाती सेलच्या माध्यमातून मागावर्गीय समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे. तसेच मागासवर्गीय नागरिक व विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व जातपडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचण येवू नये यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे आणि भीमाई स्मारकासह पुढील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन सातार्‍यात उत्साहात साजरा करण्यात येईलच त्याचबरोबर शाळाप्रवेश दिन देशभर व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मिलींद काकडे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, काकडे यांची निवड झाल्याबद्दल पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यानी त्यांचे अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.