सस्तेवाडीमध्ये शॉक बसून मुलगा जखमी


फलटण : फलटणनजीक सस्तेवाडी येथील मोरेमळा येथे शेतातील उघड्या डीपीतील फ्यूज तारेला हात लावल्यामुळे चार वर्षांचा मुलगा जखमी झाला. 

सस्तेवाडी येथे सौ. अलका सुनील भंडलकर यांचा चार वर्षांचा मुलगा मयुरेश सुनील भंडलकर याला घेऊन घराशेजारी मोरेमळा येथे शेतातील गव्हास पाणी देण्यास गेल्या होत्या. सौ. अलका पाणी देण्यात व्यस्त असताना छोटा मयुरेश खेळत-खेळत उघड्या डीपीकडे गेला. त्या डीपी बॉक्सला त्याचा हात लागल्याने जोराचा विद्युत शॉक बसून मयुरेश फेकला गेला व बेशुद्ध पडला. त्यानंतर मयुरेशला तातडीने फलटण येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती देऊनही घटनास्थळाचा महावितरणकडून पंचनामा करण्यात आला नाही. महावितरणने भाजलेल्या मुलास उपचारासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments

Powered by Blogger.