न्यू इंग्लिश स्कूलचा दि. ६ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्मृतीगंध मेळावासातारा: येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सन २००० पूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतीगंध मेळावा दि. ६ डिसेंबर रोजी आयोजित केला असल्याची माहिती अमित कुलकर्णी यांनी दिली.

येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये आज सोमवार (दि. ४) रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कुलकर्णी बोलत होते.

यावेळी प्रभारी मुख्याध्यापक डी. एस. कांबळे, सारंग कोल्हापुरे, डॉ. संजीव गोखले, माधव सारडा, धनंजय थोरात, सौ. संध्या चौगुले, सौ. दिक्षीत, सौ. नीता सोहोनी, डॉ. संदीप श्रोत्री यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

कुलकर्णी म्हणाले,   दि. ६ डिसेंबर रोजी शाळेचा ११८ वा वर्धापन दिन आहे.  यानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलच्या सन २००० पूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतीगंध मेळावा दि. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत शाळेच्या मैदानावर आयोजित केला आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.newenglishschoolsatara.com या वेबसाईटवर जाऊन आपले नाव नोंदवा.

No comments

Powered by Blogger.