वाईत विवाहितेवर अत्याचारवाई : पतीस जीवे मारण्याची धमकी देऊन वाई येथील एका विवाहितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत अर्धनग्‍नावस्थेतील फोटो काढून बदनामीची भीती दाखवत ब्लॅकमेल करत सातत्याने अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरोधात वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोघा संशयित आरोपींपैकी वाखरी (ता. फलटण) येथील पैलवान दादा बापूराव ढेकळे याला वाई पोलिसांनी अटक केली असून ढेकळे हा फलटण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे.

एक विवाहिता पती व इतर कुटुंबीयासमवेत वाई येथे राहत आहे. तिच्या कुटुंबातील काही लोकांचे या प्रकरणातील संशयित दादा ढेकळे याच्यासमवेत ओळख होती. या ओळखीमधून दादा ढेकळे याचे पीडित महिलेच्या घरी येणे-जाणे होते. या ओळखीचा गैरफायदा घेत दादा ढेकळे याने दि. 20 मे 2007 पासून त्या महिलेस मी पैलवान असून मी तुझ्या पतीला जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या देऊन संबंधित महिलेवर वाई, लोणंद, खंडाळा व फलटण येथे नेऊन वारंवार अत्याचार केले.

यानंतर ढेकळेने संबंधित महिलेची माहिती पुणे येथे राहणार्‍या पंकज बबन निकम यास दिली. त्यानंतर निकम यानेही पीडित महिलेला बदनामी करण्याची भीती दाखवत त्या महिलेवर वारंवार अत्याचार केले. निकम याने पीडित महिलेचे अर्धनग्नावस्थेतील फोटो काढून तिला त्याद्वारे ब्लॅकमेल करत संबंधित महिलेवर दोघे संशयित वारंवार अत्याचार करत होते. या सर्व गोष्टी असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने बुधवार, दि. 6 रोजी रात्री वाई पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात तक्रार नोंदवली. मुख्य संशयित आरोपी दादा ढेकळे हा वाखरीचा माजी सरपंच असून, तो सध्या राष्ट्रवादी युवकचा पदाधिकारी आहे.

No comments

Powered by Blogger.