घंटागाडीधारकांनी स्वत:चे बरे वाईट करुन घेतल्यास सत्ताधारी जबाबदार राहतील: सौ. सिद्धी पवार
सातारा : येथील घंटागाडी संघटनेने नुकताच आत्मदहनाचा इशारा दिला आहे. घंटागाडीधारकांना न्याय न मिळाल्यास ते स्वत:चे बरे वाईट करुन घेतील, याला सर्वस्वी सत्ताधारी जबाबदार राहतील, असे मत नगरसेविका सौ. सिद्धी पवार यांनी व्यक्त केले.

सातारा शहर घंटागाडी संघटनेच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आल्यानंतर सौ. पवार बोलत होत्या.

येथील नगरपालिकेत सध्या 40 घंटागाड्या गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. ह्या सुशिक्षीत बेरोजगार युवकांच्या व गरिब कुटुंबातील व्यक्तींच्या आहेत. घंटागाड्यांमुळे सुमारे 100 लोकांचा उदरनिर्वाह होतो. परंतू, नगरपालिकेने एका खाजगी कंपनीला घंटागाड्यांचा ठेका दिला असल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जुन्या गाड्यांनाच करार करुन कायम ठेवावे व त्यांच्यावर उपासमारी होऊ नये, अशी आमची मागणी आहे.

जुन्या लोकांना कायम न केल्यास नैराश्यातून जुने लोक स्वत:चे काहीतरी बरे वाईट करु शकतात. जुन्या लोकांना योग्य न्याय मिळावा. जुन्या गाड्यांचा प्रश्‍न सुटेपर्यंत नव्या गाड्या सुरु कराव्यात. अन्यथा, आगामी काळात प्रक्षोभक घडामोडी घडल्यास त्यास सत्ताधारी जबाबदार राहतील, असे प्रतिपादन नगरसेविका सौ. सिध्दी पवार यांनी केले.

No comments

Powered by Blogger.