अखेर बिबट्याने शेळी फाडली?
फलटण: फलटण शहरात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या बातमीने संपूर्ण शहरच नव्हे तर तालुका हादरुन गेला असून शालेय विद्यार्थी / विद्यार्थिनी महिला वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले असतानाच आज तांबमाळ, फरांदवाडी ता. फलटण येथे हिंस्र प्राण्याने घरा समोरील शेळी वर हल्ला करुन ठार मारल्याची घटना घडली आहे.

फरांदवडी ता. फलटण येथे आज(शुक्रवार) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास तांबमाळ परिसरात तामजाईदेवी मंदिरासमोर राहणाऱ्या राजेंद्र बबन जाधव यांच्या घरासमोर बांधलेल्या ५ महिने वयाच्या शेळीवर हल्ला करुन ठार केले असून जाधव यांच्या कुटुंबातील महिलांनी हा प्रकार पाहिल्याचे सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे हा प्राणी तरस असल्याचे निदर्शनास येत असून सदर घटनेचा पंचनामा वनाधिकारी यांनी केला आहे.

फलटण शहरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलेला बिबट्या आणि आज फरादवाडी येथे घडलेला प्रकार पाहता संभ्रमावस्था निर्माण होत असून शहरात बिबट्या आहे हे निश्चित असताना प्रत्यक्षदर्शीनी हल्ला केलेला प्राणी तरस असू शकतो हे सांगितले आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले असून वन अधिकारी यांनी कसोशीने तपास करुन शहर व परिसर पिंजून काढून सोक्ष मोक्ष लावला पाहिजे अशी मागणी नागरिकांच्यातुन होत आहे.

No comments

Powered by Blogger.