‘जीएसटी’च्या नावाखाली कामगार कपातकराड : तासवडे (ता. कराड) येथील एमआयडीसी मधील कंपन्यांनी जी. एस. टी. नावाखाली अनेकांना कामावरून काढले, तर अनेकांचे पगार कमी करण्यात आले आहेत त्यामुळे अनेकांचे संसार उघडयावर आले असून कामगारावर बेरोजगार बरोबरच बेघर होण्याची वेळ आली आहे.

एमआयडीसी मध्ये सुमारे 300 ते 350 कंपन्या आहेत. हजारो कामगार याठिकाणी काम करत आहेत. त्यामध्ये उंब्रज, पाली, वहागाव, मसुर, पाटण या भागातील कामंगार आहेत, त्याच बरोबर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या भागातील कामगार एमआयडीसीच्या परिसरात भाड्याने किंवा जागा घेऊन घरे बांधून राहीलेले आहेत. त्याचबरोबर यामधील ब-याच कामगारांचे जवळजवळ निम्मे आयुष्य येथील कंपन्यात काम करताना गेले आहे . यामध्ये अनेक कामगार कायमस्वरूपी कंपन्यात कामाला आहेत.

शासनाने जी. एस टी लागु केल्या पासून अनेक कंपन्यांनी जी. एस टी च्या नावाखाली कामगारांना आमचे उत्पादन घटले असल्याचे सांगितले आहे. सद्यस्थित तयार होणार्‍या उत्पादनावर मोठया प्रमाणात जी. एस. टी. कर आकारला जात आहे. त्यामुळे कंपन्यांनी सर सकट कामगारांची कपात करण्यास सुरवात केली आहे. तसेच आम्ही देऊ त्या पगारात काम करावे लागेल अशा प्रकारचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे अनेक कामगारांच्या वर बेरोजगारची कु-हाड कोसळली असुन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामध्ये कायमस्वरूपी कामगाराचाही समावेश असुन त्यांची तर परिस्थिती अतिशय भनायक झाली आहे. कारण त्यांचे निम्मे आयुष्य या कंपन्यात काम करण्यात गेले आहे . या कामाच्या जीवावरच ते एमआयडीसी परिसरात जागा घेवुन वा भाड्याने घर घेवुन कुटुंबसह राहात आहेत. त्यांच्या पगारात वाढ करण्याऐवजी कंपन्यांनी जीएसटी चा बागलबुवा उभा करून पगारात कपात केली आहे.

तसेच वय वाढल्यामुळे दुसरीकडे काम मिळण्याची शक्यताही नाही. त्यामुळे कायमस्वरूपी असणारे कामगार द्विधा मनस्थित सापडले आहेत . या पगारात अक्षरशः घराचे भाडे सुध्दा भागत नाही , त्यातच घरमालक घराचे भाडे दया अन्यथा घर खाली करा म्हणून मागे लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या वर बेरोजगारी बरोबरच बेघर होण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे आम्हाला कोण वाली आहे का नाही ?असा प्रश्‍न कामगारांसह कुटुंबाकडून विचारण्यात येत असून कंपन्याच्या या धोरणाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे .

No comments

Powered by Blogger.