सैनिकांच्या भरतीस जोरदार प्रारंभ


सातारा :  सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या सातार्‍यात रात्री १२ वाजल्‍यापासून सैन्य भरतीस सुरुवात झाली आहे. ही भरती छत्रपती शाहू जिल्हा स्पोर्टस ग्राउंड व पोलिस परेड ग्राउंड येथे होत आहे. दोन्ही मैदानात ठिकठिकाणी बॅरेकेट्स, कॅम्प उभारण्यात आले आहेत. सात वर्षानंतर प्रथमच सातार्‍यात सैन्य भरती होत आहे. भरतीला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, दोन्ही मैदानात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सैन्य भरती कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत दिनांक ८ ते १८ डिसेंबरपर्यंत ही सैन्य भरती सातारा येथे होणार आहे. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदूर्ग व गोवा आणि त्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव या तालुक्यांतील युवकांना संधी दिली जाणार आहे. रात्री १ वाजल्यापासून युवकांना मैदानी चाचणीसाठी मैदानामध्ये प्रवेश दिला आहे. सैन्य दलाच्या कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद रिक्रूटिंग ऑफिसेसच्या नियंत्रणाखाली युवकांची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.