मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांच्या हस्ते ‘धनंजयभाऊ’ दिनदर्शिकेचे प्रकाशन


सातारा : मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या ‘धनंजयभाऊ’ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्र्यांनी जांभळे यांच्या कार्याचे कौतुक केले.

ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, धनंजय जांभळे हे लोकहिताची कामे राबवण्यात पुढे असतात. दिनदर्शिकेत दिलेली माहिती लोकांसाठी उपयोगी आहे.

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय जांभळे यांच्या ‘धनंजयभाऊ’ या दिनदर्शिकेत नागरिकांच्या गरजेच्या असणार्‍या शासकीय योजनांची माहिती दिली आहे.

यावेळी भाजप नगरसेवक मिलिंद काकडे, अ‍ॅड. प्रशांत खामकर, अ‍ॅड. नितीन शिंगटे, विठ्ठल बलशेटवार, सचिन साळुंखे, संतोष साळुंखे, अतुल पिसाळ, अमर गोळे, गौरव गाडेकर आदि उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.