सेल्फी आली युवकाच्या अंगलटसातारा: अजिंक्यतारा येथील एका दगडावरून सेल्फी घेत असताना पाय घसरून पडल्याने युवक गंभीर जखमी झाला. जखमी युवकाचे नाव अनिकेत विठ्ठल शिरपे (वय २२,रा.करंजे पेठ सातारा ) असे आहे. त्या युवकास सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिकेत हा एका महाविद्यालयात शिकतो. ईदची सुट्टी असल्याने तो त्याच्या पाच ते सहा मित्रांसोबत अजिंक्यतारा किल्याच्या परिसरात फिरण्यासाठी शुक्रवारी दुपारी गेला होता.किल्ल्याच्या परिसरात असलेल्या एका दगडावर तो उभा राहून सेल्फी घेत होता. सेल्फी घेत असताना त्याच्या पायातील चप्पल घसरली. तो धडपडत खाली पडला. गंभिर जखमी झाला असून त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांनी त्याला लगेच त्यातून बाहेर काढून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले होते. तेथून पुढे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.