घंटागाडीधारकांचा शहरात घंटानादसातारा: घंटागाडीधारकांनी आज सकाळी घंटानाद रॅलीचे आयोजन केले होते. बोगद्यापासून निघालेल्या या घंटानाद रॅलीने नगरपालिका, राजवाडा, मोती चौकापासून खालच्या रस्त्याने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा घंटानाद केला. शहरातील बहुतांश घंटागाडीधारक या रॅलीत स्वत:च्या वाहनासह सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सर्व घंटागाडीधारकांनी सध्या ठाण मांडले आहे.

No comments

Powered by Blogger.