ट्रिप्सी चालवणाऱ्यानीच पोलिसांना रस्त्यावर पडून हाणलेक-हाड : एकाच दुचाकीवरून तिघेजण निघालेल्या युवकांना अडविल्यानंतर संबंधित युवकांनी दोन वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण केली. संबंधित युवकांनी पोलिसांना अक्षरश: रस्त्यावर पाडून मारले. ही संतापजनक घटना शहरातील दत्त चौकात रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हवालदार उमेश बाजीराव माने व सहायक फौजदार बळवंत दादू चव्हाण अशी मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कºहाड शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील सहायक फौजदार बळवंत चव्हाण व हवालदार उमेश माने हे रविवारी दुपारी दत्त चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बसस्थानकाकडून एका दुचाकीवरून तीन युवक येत असल्याचे हवालदार माने यांच्या निदर्शनास आले.

माने यांनी संबंधित दुचाकी अडविली. तसेच दुचाकी चालविणाºया युवकाकडे वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली. मात्र, संबंधित युवकाने अरेरावी करीत माने यांना धमकावण्यास सुरुवात केली. ह्यमी कोण आहे तुला माहिती आहे का?ह्ण असे म्हणत त्याने माने यांच्या कॉलरला हात घातला. त्यावेळी सहायक फौजदार चव्हाण त्याठिकाणी आले. त्यांनी त्या युवकास समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकाने माने तसेच चव्हाण यांना धक्काबुक्की करीत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच गाडीची तलवार काढा रे, बघतोच यांना,ह्ण असे म्हणत त्याने अन्य दोन युवकांच्या मदतीने माने व चव्हाण यांना रस्त्यावर पाडले.

ही घटना समजताच क-हाड शहर पोलिस ठाण्यातील अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले. तर अन्य दोघे तेथून पसार झाले. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

No comments

Powered by Blogger.