बनवडी ग्रामपंचायतीस आय.एस.ओ. मानांकन


कोपर्डे हवेली  : बनवडी (ता.कराड) येथील ग्रामपंचायतीने अनेक विकासकामे राबवून इतर ग्रामपंचायतीच्या समोर एक वेगळा आदर्श ठेवला असतानाच  ग्रामपंचायतीस आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्याने गावाच्या शिरपेचात तुरा रोवला आहे. बनवडी कराड तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
बनवडीसह कराड तालुक्यातील  अनेक  ग्रामपंचायतीने आय.एस.ओ. मानांकनासाठी नोंदणी केली होती.या ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण संस्था पातळीवर करण्यात आले.या सर्वेक्षणात बनवडी ग्रामपंचायतीने गुणात्मक पातळीवर आघाडी घेवुन तालुक्यात आए .एस.  ओ.मानांकनाचा प्रथम मान मिळवला. आय एस ओ मानाकंनासाठी पाहणी पथकाने ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी, ऑडिट,गावाची स्वच्छता, ग्रामपंचायतीची इमारत, त्यातील वेगवेगळ्या विभागाची मांडणी,पिण्याच्या पाण्याची चोवीस बाय सात योजना,रस्ते,अंगणवाड्या.प्राथमिक शाळा.विद्यालय ,घनकचरा विल्हेवाट प्रकल्प,गावातील विविध उपक्रमातील.
सातत्य.तसेच या समितीने गावातील लोकांचे ग्रामपंचायतीचे विषयाचे अभिप्राय नोंदवून घेतले. या शिवाय गावातील विकासाबरोबर ग्रामपंचायतीचे सामजिक योगदान, शासकिय कामातील सहभाग,लोकांचा सहभाग या गोष्टीसह इतर सकारात्मक गोष्टी पाहिल्या सतत विकासाचे टप्पे गाठणार्‍या ग्रामपंचायतीस आय.एस.ओ मानाकंन मिळाल्याने गावाच्या शिरपेचाचा तुरा रोवण्याचे काम ग्रामपंचायतीने केले आहे.

No comments

Powered by Blogger.