iDainik.com ला पाच लाखाहून अधिक पेजव्ह्यूजसातारा: सातारा जिल्हावासीयांचे हक्काचे डिजीटल व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या www.idainik.com या न्युज वेब पोर्टलने पाच लाख पेजव्ह्यूचा टप्पा ओलांडला आहे.

गत फक्त चार महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या www.idainik.com या न्युज वेब पोर्टलने नुकताच पाच लाख पेजव्ह्युजचा टप्पा ओलांडला आहे. आज दि. 3 डिसेंबर रोजी वेबसाईटचे स्टॅट्स पाहिले असता 5,39,260 नेटीझन्सनी या वेबसाईटचे पेजव्ह्यू केल्याची माहिती दिसत आहे. दररोज सुमारे पंधरा ते वीस हजार नेटिझन्सचे पेजव्ह्यू www.idainik.com ला असतात.


www.idainik.com सुरु केल्यानंतर मिळत असलेल्या प्रतिसादामुळे काम करण्याचा  वेगळा उत्साह मिळत आहे. सातारा जिल्हावासीयांच्या हक्काचे डिजीटल व्यासपीठ म्हणून www.idainik.com कडे पाहिले जात आहे. आगामी काळात नवनवीन संकल्पना राबवून नेटीझन्सना विश्वासार्ह बातम्या कशा पोहोचवता येतील? हे आम्ही पाहणार आहोत.

          - चैतन्य दिलीप रुद्रभटे, सातारा

No comments

Powered by Blogger.