दुचाकी व स्विफ्ट कारची समोरासमोर धडक,1जागीच ठार 


फलटण : दहिवडी येथील फलटण रस्त्यावरील तिकटण्याजवळ दुचाकी व स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दहिवडीतील शबनम धाब्याचे मालक इन्नूस ऊर्फ राजाभाऊ हमीद शेख जागीच ठार झाले.शबनम धाब्याचे मालक इन्नूस शेख रविवारी सायंकाळी दहिवडी-फलटण रस्त्यावर धाब्याकडे चालले होते. यावेळी समोरून येणार्‍या स्विफ्ट कारने (एमएच 12 एनबी 4547) त्यांच्या स्कुटरला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर स्कुटरचा चक्काचूर झाला. तसेच स्वीफ्ट कारचेही मोठे नुकसान झाले

No comments

Powered by Blogger.