महात्मा गांधी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी


पाचगणी  :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज आजच्या पिढीला आहे. त्यासाठी गांधीजींच्या आचार व विचारांचे स्मरण होण्याबरोबरच ते समाजात रुजण्याची आवश्यकता वाटत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी सोपानराव घोरपडे यांनी केले.

महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांचे पवित्र वास्तव्य लाभलेल्या पांचगणी (ता.महाबळेश्वर) येथे महात्मा गांधी पुण्यतिथी महात्मा गांधी स्मारक समिती, सह्याद्री मराठी पत्रकार संघ आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमानी साजरी झाली . बाथा हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात श्री घोरपडे बोलत होते. यावेळी विजय दिवाण, शिवाजी राऊत, अरुण शेळके, विजय निकम, जालिंदर पाटील, भरत लोकरे, प्रमोद क्षीरसागर, भूषण शेळके , असलम तडसरकर, रोटारीचे अध्यक्ष महेंद्र पांगारे, पत्रकार रविकांत बेलोशे, बाथाच्या प्राचार्या आर डी भावनगरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिजित होसमानी, आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यांनातील आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपली एकजूट रॅली सुरु झाली . यामध्ये सर्व गांधीप्रेमी व महात्मा फुले विध्यमांदिर, घाटजाई विद्यामंदिर व नगरपालिका विध्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. महात्मा गांधी अमर राहे....हिंसा नको अहिंसा हवी....अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या . डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हि रॅली छत्रपती शिवाजी चौकात आली या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हि एकजूट रॅली बाजारपेठेतून पांचगणी आरोग्य केंद्रात आली या ठिकाणी महात्मा गांधी व कस्तुरबांच्या वास्तव्याच्या स्मृतिखुना आहेत या आवारात त्यांच्या वापरातिलं वस्तूंची माहिती यावेळी शिवाजी राऊत यांनी दिली व त्यास वस्तू दाखवल्या. या ठिकाणी रुग्णालयाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवराच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर हि रॅली महात्मा गांधीजींचे प्रार्थनास्थळ असणाऱ्या बाथा हायस्कूल येथे आली. येथील सभागृहात हुतात्मा अभिवादन व आदरांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना मुख्याध्यापिका भावनगरी म्हणाल्या महात्मा गांधीजींच्या सत्य, शांती, अहिंसा या शिकवणीची बीजे लहानपणापासूनच बालकांच्या मनात रुजल्यास वर्तमानातील सकारात्मक विचाराची भावी पिढी राष्ट्राची खरी संपत्ती ठरणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक , विध्यार्थी व गांधीप्रेमी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.