‘भीतीने मागे वळला आणि पोलिसांनाच धडकला’


फलटण : बरड ता.फलटण येथील पेट्रोल पंपाजवळ पोलिस वाहनाचा अपघात झाला. त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण भागामध्ये अनेक वाहनांची तपासणी करण्यासाठी सातारा परिवहन विभागाच्या वतीने वाहने तपासणीचे काम बरड परिसरात सुरू होते. यावेळी पुणे-पंढरपूर रस्त्यावरून सागर देविदास बोराटे (वय 30) रा.लोणंद (नातेपुते)ता.माळशिरस हे मोटारसायकलवरून जात होते.

तपासणी करत असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सागर घाबरले. ते अधिकारी त्यांचा पाठलाग करत आहेत असा समज झाल्याने त्यांनी गाडी मागे वळवली. गाडी मागे वळल्यावर त्यांची धडक समोरून येणाऱ्या पोलिस गाडीला बसली. यामध्ये त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला असून त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे यांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.