राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी मायणीच्या तीन खेळाडूंची निवड


मायणी :- तेलंगाणा, हैद्राबाद येथे होणाऱ्या 14 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय नेटबाल स्पर्धेसाठी भारतमाता विद्यालयातील इयत्ता आठवीतील ओमसाई संजय जाधव,प्रसाद हनुमंत भोसले व वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाळेतील कु. श्वेता संजय पाटोळे यांची निवड झाली आहे. तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून भारतमाता विद्यालय मायणीचे क्रीडा शिक्षक श्रीमंत कोकरे (क्रीडाशिक्षक) यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, चेअरमन सुरेंद्र गुदगे, भारतमाता विद्यालय व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य प्रमोद इनामदार,मुख्याध्यापिका वृषाली पाटील ,मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिंनी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले असून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments

Powered by Blogger.