म्हसवड पालिकेच्या नळपाणी पुरवठ्याची चौकशी


म्हसवड :- म्हसवड नगरपरिषदेच्या असलेल्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या कामांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी चौकशी समिती गठीत केली असुन या समितीने सदर कामावर जावुन प्रत्यक्ष पाहणी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
म्हसवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या योजनेवरील मेनलाईन दुरुस्ती च्या नावाखाली लाखो रुपयांचा चा निधी हडप करुन मोठा भ्रष्टाचार यापुर्वीच्या सत्ताधिकार्यांनी व तत्कालीन पालिका मुख्याधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने केला असल्याचा आरोप पालिकेतील सत्ताधारी गटाचे नगरसेवक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश रसाळ यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री शिवतारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करुन त्याबाबतचे पुरावे सादर केल्याने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना दिल्याने जिल्हाधिकारी सातारा यांनी याकामाची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नियुक्त केली असुन या समितीने याप्रकणाची संपुर्ण चौकशी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश जारी केला आहे, याबाबत रसाळ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. ५ जानेवारी २०१८ रोजी सदर पाईपलाईन कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली असता पालकमंत्री शिवतारे यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत या कामी जिल्हाधिकारी सातारा यांनी लक्ष घालुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, 

त्यानुसार जिल्हाधिकारी सिंघल यांनी सदर कामी अधिकार्यांची एक चौकशी समिती नियुक्त केली असुन उपजिल्हाधिकारी महसुल हे समितीचे प्रमुख राहणार असुन त्यामध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग, जिल्हा प्रशासन अधिकारी आदींचा त्यामध्ये समावेश राहणार आहे, सदर समितीने याप्रकणाची संपुर्ण चौकशी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंघल यांनी दिले असुन याकामी म्हसवड पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी सदर चौकशी समितीस संपुर्ण सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जिल्हाधिकार्यांच्या या आदेशामुळे मात्र पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली असुन या प्रकरणात नक्की काय होणार की नुसतीच चौकशी होणार याबाबत म्हसवडकर जनतेतुत उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या असुन याबाबत तक्रारदार नगरसेवक रसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की माझ्या तक्रारीवरुन त्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असली तरी त्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर जोवर कारवाई होत नाही तोवर आपण स्वस्त बसणार नाही.
दरम्यान - चौकट
सदर कामी चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती समोर येताच याकामावरील संबधित ठेकेदाराने दि. १७ जानेवारी रोजी सदर पाईपलाईनवर १० ते ११ ज्वाईंट एका दिवसात बसवुन दिल्याची माहीती समोर येत आ

No comments

Powered by Blogger.