पाटणला २ व ३ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन


पाटण : स्वा. सै. स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दि. 2 व शनिवार दि. 3 फ्रेब्रुवारी रोजी पाटण येथे ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सांस्कृतिक, साहित्याचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तथा स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी दिली.

शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ भव्य ग्रंथदिंडीचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दिपक शिंदे, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, पोलीस उपअधीक्षक सौ. निता पाडवी, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, गटशिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांच्या उपस्थितीत होणार आहे.

संमेलनाचे उद्घाटनास ज्येेष्ठ कवी व लेखक प्रा. वैजनाथ महाजन सांगली हे संमेलनाध्यक्ष, आ. शंभुराज देसाई, आ. नरेंद्र पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, भा. ज. प. चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांची प्रमुख उपस्थिती आहे.

दुपारी दोन वाजता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ठ लोकनाट्य कलावंत सौ. मंगला बनसोडे यांचा जाहीर नागरी सत्कार व त्यांची प्रकट मुलाखत ज्येेष्ठ कलावंत अरूण खांडके व गणेशचंद्र पिसाळ घेणार आहेत. दुपारी चार वाजता कवी संमेलन, दि. 3 रोजी सकाळी साडेदहा वाजता स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारे व्याख्यान, सकाळी साडेअकरा वाजता मृत्युंजय प्रतिष्ठान पुणेचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. सागर देशपांडे यांचे मृत्युंजय कादंबरीवर विवेचन, दुपारी दीड वाजता प्रा. विजय जाधव, मिरज यांचे कथाकथन, दुपारी तीन वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे. असून यावेळी अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आर पी आयचे पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रा. रविंद्र सोनावले , म न से तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.

यावेळी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विक्रमबाबा पाटणकर व संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.