वाई न्यायालयासमोर तीन वाहनांचा विचित्र अपघात


वाई :वाई-पुणे रस्त्यावर वाई न्यायालयासमोर तीन टुरिस्ट वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी यात कोणीही जखमी झालेले नाही.

या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, महाबळेश्वरहून पुण्याकडे जाणारा भरधाव टेंम्पो ट्रँव्हलर (एमएच 12 एचबी 2161) ने तिकाटण्यात पुण्याकडे जाणार्‍या इंडिका क्र.एमएच 11 एएल 9744 ला पाठीमागून जोरदार धडक दिली. याचदरम्यान महागणपतीचे दर्शन घेऊन जाणार्‍या ट्रॅक्स एमएच 14 बीए 3164 वाहनाला इंडिकाची जोरदार धडक बसली. त्यामुळे या तिकाटण्यात दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर भितीने टेंम्पो ट्रव्हल्सच्या चालकाने धूम ठोकली. तर ट्रव्हल्स व इंडिकातील प्रवासीही निघून गेले. दोन्ही बाजूने धडक बसल्याने इंडिकाचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे वाई-पुणे रस्त्याची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

No comments

Powered by Blogger.