नागठाणेत युवकावर हल्‍लासातारा : नागठाणे (ता. सातारा) येथे वैभव धनाजी साळुंखे (वय 26) या युवकावर हल्‍ला चढवून त्याला बेदम मारहाण झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यात्रा काळात ही घटना घडल्याने तणावपूर्ण वातावरण असून घटनेची कुठेही नोंद झालेली नाही.

वैभव साळुंखे याला मारहाण झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती साळुंखे याच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याचे समोर आल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वैभवला सिव्हीलमध्ये दाखल कोणी केले? हे समोर आले नाही. प्राथमिक माहितीनुसार वैभवला गुरुवारी मध्यरात्री मारहाण झाल्याची शक्यता असून घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

सध्या नागठाणे येथे यात्रा सुरु आहे. यात्राकाळात मारहाणीची घटना घडल्याने तणावाचे वातावरण आहे. याबाबत मात्र बोरगाव पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

No comments

Powered by Blogger.