सयाजी तिरमके लोणंद गौरव पुरस्काराने सन्मानित


लोणंद :- सयाजी तिरमके (सर ) लोणंद गौरव पुरस्काराने सन्मानित........ लोणंद फाउंडेशन, लोणंद ( ता. खंडाळा ) चे वतीने दिला जाणारा बहुमूल्य असा सन २०१८ चा लोणंद गौरव पुरस्कार हा क्रिडाक्षेत्रातुन लोणंद व पंचक्रोशीतील अनेक युवकांचे करिअर घडविणाऱ्या व अविरतपणे सुमारे २५ वर्षाहुन ही अधिक काळ निस्वार्थीपणे कार्यरत असलेल्या मा. सयाजी शंकरराव तिरमके यांस रविवार दिनांक - २८ जानेवारी २०१८ रोजी नगरपंचायत पटांगण वर भव्य समारोहात दिमाखात वितरण करण्यात आला व लोणंद नगरित कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचा ऐतिहासिक असा उपक्रम सी. सी. टिव्ही कॅमेरे मान्यवरांच्या हस्ते रिमोट द्वारा स्क्रीनवर प्रक्षेपित करुन लोकार्पण करण्यात आले तसेच लोणंद शहरातील जडणघडणीत योगदान देउन लोणंद नगरिचे नाव उंचावणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा, खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सेवा व विक्रीकर पुणे उपायुक्त मा. राहुल चंद्रकांत खरात साहेब, कुस्ती सम्राट व कुस्ती भुषण पैलवान सुमारे ५१ गदांचे मानकरी मा.आस्लम काझी, ग्रामीण कथाकार प्रा. रविंद्र कोकरे सर, वाकोला मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र शेळके पाटील साहेब, सी. बी. आय. पुणे पोलीस निरीक्षक मा. संदीप भोसले साहेब, लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. सोमनाथ लांडे साहेब, लोणंद नगरपंचायतचे नगराध्यक्षा सन्मानिय सौ. स्नेहलता शेळके पाटील, उपनगराध्यक्ष मा. लक्ष्मणराव शेळके पाटील (तात्या), गटनेते नगरसेवक मा. योगेशदादा क्षीरसागर, पक्षप्रतोद, नगरसेवक मा. हणमंतराव शेळके पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नगरसेवक मा. सचिन शेळके पाटील, नगरसेविका मा. श्रीमती. शैलजा खरात, खंडाळा नगरपंचायत नगरसेवक मा. साजिदभाई मुल्ला, ज्येष्ठ पत्रकार मा. शंकरराव जाधव आप्पा, खंडाळा पंचायत समिति चे माजी सभापती मा. विनोददादा क्षीरसागर, मकरंद आबा पाटील पतसंस्थेचे तज्ञ संचालक मा. रविंद्रभाऊ क्षीरसागर, गजानन अप्लायंसेस चे प्रसिद्ध व्यापारी मा. के. रामचंद्र राव, लोणंद ग्रामपंचायत चे माजी सरपंच मा. देवकीबाई डोईफोडे,लोणंद - निरा इंडियन मेडिकल एसोसिएशन चे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, लोणंद मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. किशोर बुटीयाणी सर, डॉ. सौ. संगीता बुटीयाणी, लोणंद मुस्लिम सुन्नी जमाआत लोणंद चे अध्यक्ष राजूभाई कुरेशी, लोणंद कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा. शिवाजीराव शेळके पाटील, आदी प्रमुख पाहुणे व सर्व पत्रकार बांधव, विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.


सोहळा यशस्वी करण्यासाठी लोणंद फाउंडेशन, लोणंद चे अध्यक्ष मा. दयानंदभाऊ खरात, उपाध्यक्ष डॉ. सौ स्वाती शहा, सह उपाध्यक्ष सागर शेळके, खजिनदार सुनील शहा, कायदेशीर सल्लागार अॅड. विलायतभाई मणेर, सचिव कय्युमभाई मुल्ला, महंमदभाई कच्छी, चंद्रकांतदादा जगताप, डॉ. गणेश दाणी, डॉ. जयश्री यादव, मा.ममता अरोरा, सौ. दिपिका घोडके मॅडम, भावेश दोशी, हेमंतआप्पा पवार, संतोष खरात, प्राजीत परदेशी, संतोष मुसळे, दिपक बाटे, स्वप्नील दगडे, गोविंद पटेल, प्रा. अमीर इनामदार, किरण खरात, अमोल काळे, शांतीलाल परदेशी, राजूशेठ आग्रवाल, आदी पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. ( लोणंद गौरव पुरस्कार सयाजी वि


या सोहळ्यात ग्रामीण कथाकार प्रा. रविंद्र कोकरे सर यांचे अप्रतिम असे चला आनंदी जगुया या विषयावर व्याख्यान झाले तर प्रास्ताविक लोणंद फाउंडेशन, लोणंद चे अध्यक्ष दयानंदभाऊ खरात यांनी केले, अप्रतिम असे सुत्रसंचलन मा. गजेंद्र मुसळे यांनी केले व आभार मुख्य मार्गदर्शक प्रा. सुनील शेळके पाटील सर यांनी मानले.


लोणंद नगरितील व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक यांनी बहुसंख्येने प्रतिसाद देऊन देदिप्यमान उपस्थिती लावली.


विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लोणंद फाउंडेशन, लोणंद च्या सर्व उपक्रमांचे खुप खुप कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.परिश्रम घेतले. ( लोणंद गौरव पुरस्कार सयाजी तिरमकेसर यांना प्रदान करताना अध्यक्ष, दया ( काका ) खरात, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील, सेवा व विक्रीकर पुणे ऊपायुक्त मा. राहुल खरातसाहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. सोमनाथ लांडे साहेब कुस्ती सम्राट आस्लम काझी, पक्षप्रतोद नगरसेवक मा. हणमंत शेळके पाटील, ग्रामीण कथाकथनकार प्रा. रविंद्र कोकरेसर, आदी मान्यवर )

No comments

Powered by Blogger.