लोणंद फाऊन्डेशनच्या वतीने लोणंद शहरात बसवणार सीसीटीव्ही


लोणंद : - लोणंद फाऊन्डेशनच्या वतीने लोणंद शहरात राबविण्यात येणारे सामाजीक उपक्रम निश्चीतच कौतुकास्पद असुन संपूर्ण गावात सीसीटीव्ही बसविण्यात येत असलेले सीसीटीव्ही चा उपक्रमाचा आदर्श महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी घेतला जाईल तर समाजात निस्वार्थी पणाने काम करणाऱ्या सयाजी तिरमके सारख्या व्यकतीं गौरव करुन तरुणाना दिशा देण्याचे काम महत्वपुर्ण आहे असे प्रतिपादन प्रसिध्द ग्रामीण कथा कथनकार प्रा.रविंद्र कोकरे यांनी केले.
लोणंद येथील लोणंद फाऊंडेशन च्या वतीने आयोजीत केलेल्या लोणंद गौरव पुरस्कार क्रिडा प्रशिक्षक सयाजी तिरमके यांना प्रदान समारंभ ,सी सी टी व्ही लोकार्पण सोहळा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभात प्रा. रविंद्र कोकरे प्रमुख वकते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य वस्तु व सेवा कर उपायुकत राहुल खरात होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पैलवान आस्लम काझी , नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके - पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके- पाटील, पो.नि.संदीप भोसले, सपोनि सोमनाथ लांडे, डॉ नितिन सावंत,ज्येष्ठ पत्रकार शंकराव जाधव, के रामचंद्र राव, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हनुमंत शेळके,शैलजा खरात, सचिन शेळके , रविंद्र क्षीरसागर, विनोद क्षीरसागर, सुभाष घाडगे मिठुभाई पटेल, देवकीबाई डोईफोडे,शिवाजीराव शेळके पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.रविंद्र कोकरे म्हणाले, माणसाने आनंदी पणे जगण्याची गरज आहे माणूस किती जगाला त्यापेक्षा कधी जगला याला महत्व आहे. आपल्या मुलावर संस्कार करण्याची गरज आहे तर आजच्या मुलांनी भरकटत न जाता आपल्या आई वडिलांचा आदर राखावा
लोणंद फाऊंडेशनचे काम समाजाला प्रेरणा देणारे आहे तर सी सी टी व्ही चा राबवलेला उपक्रम विधायक आहे. यावेळी राहुल खरात , लक्ष्मणराव शेळके ,राजेंद्र शेळके, संदिप भोसले , डॉ. नितीन सावंत, सोमनाथ लांडे आदींची भाषणे झाली.
यावेळी राहुल खरात यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून सी सी टी व्ही लोकार्पण सोहळा पार पडला तर सयाजी तिरमके यांना असलम काझी यांचे हस्ते लोणंद गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी गुणवंत विद्यार्थाचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सयाजी तिरमके म्हणाले ,पालकांनी आपल्या मुलांना क्रिडा क्षेत्रात त्यांची आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी दयावी मुलांना त्यांचा कल त्याच्या आयुष्याची दिशा ठरवेल
स्वागत शशिकांत जाधव यांनी केले प्रास्तावीक अध्यक्ष दयानंद खरात यांनी केले. सुत्रसंचलन गजेंद्र मुसळे यांनी केले तर आभार प्रा.सुनिल शेळके यांनी मानले.
यावेळी कय्युम मुल्ला, राजू कुरेशी ,रमेश धायगुडे, सागर शेळके, अॅड. बबलु मणेर, सुनिल शहा, राजशेखर खरात, डॉ.स्वाती शहा, दिपिका घोडके, डॉ.किशोर बुटियाणी डॉ गणेश दाणी, भावेश दोशी, महंमद कच्छी, ममता अरोरा, हेमंत पवार, सुनिल शेळके, संतोष खरात, दिपक बाटे, हे उपस्थित होते

No comments

Powered by Blogger.