कराड : ट्रॅव्हल्स घुसली उसाच्या ट्रॉलीमध्ये


कराडः - पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत डी मार्ट समोर ट्रँव्हल्सने उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये ट्रँव्हल्सच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रँव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

मलकापूर येथील डी मार्ट समोर उसाने भरून निघालेल्या टँक्टर ट्राँलीमध्ये ट्रँव्हल्स पाठीमागून घुसली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक महामार्गावरून सेवा रस्त्यावर वळवली व जखमींना रुग्णालयात पाठवले. ट्राँलीमध्ये घुसलेली ट्रँव्हल्स काढण्याचे काम सकाळी आठ वाजेपर्यंत सुरु होते.

No comments

Powered by Blogger.