कऱ्हाड : लव्ह जिहाद पदयात्रेला परवानगीचे आश्वासन


कराड : लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेसाठी पोलिस प्रशासनाकडून कराड येथे परवानगी देण्यात आली. हिंदू एकता आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी चर्चा केली.

कराडमध्ये हिंदू एकता आंदोलन समितीने लव्‍ह जिहाद जनजागृतीसाठी पदयात्रेसाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. पोलिस प्रशासनाने पदयात्रेस परवानगी नाकारल्याने समितीने दत्त चौकात उपोषण करणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले होते. या वेळी सकारात्मक चर्चा होऊन पोलीस प्रशासनाकडून हिंदू एकता आंदोलन समितीला पदयात्रेस काही अटी व शर्तीवर परवानगी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हिंदू एकता आंदोलन समितीने लाक्षणिक उपोषण स्थगित केले.

दरम्यान, कराड ते सातारा येथे २० आणि २१ जानेवारी या दोन दिवशी लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रा काढण्यात येणार होती.

No comments

Powered by Blogger.