ताथवड्यात आज बालसुकुमार साहित्य संमेलन


दुधेबावी:- ताथवडा ता. फलटण येथे आज गुरुवार दि 1 रोजी सकाळी अकरा वाजता संत गाडगेबाबा महाराज मिशन मुंबई संचलित आश्रमशाळेत बालसुकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक मोहन झेंडे यांनी दिली.

संमेलनाचे उद्घाटन नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांचे शुभहस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ताराचंद आवळे तर स्वागताध्यक्षपदी मारुती शिंदे राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशांतभाऊ सदामते राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार निलेश सोनवलकर, शक्ती भोसले उपस्थित राहणार आहेत. यानंतर साहित्यिक ज. तु. गार्डे यांचे कथाकथन होणार आहे यावेळी प्रदिप नाळे, हेमंत शिंदे बालकवी सुयश आवळे, मुख्याध्यापक तुषार सावंत, कवी अविनाश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काव्य संमेलन होणार आहे. यावेळी प्रकाश सकुंडे, प्रा. अशोक शिंदे, अशोक दिक्षित, संजय देवगुंडे, सोमनाथ सुतार, आकाश आढाव, पोपट वाबळे, नवनाथ कोलवडकर हे निमंत्रित कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. दुपार नंतरच्या सत्रात मसापचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, अॅड. शहाजी लोखंडे यांच्या उपस्थितीत समारोप होणार असून यावेळी दैनिक स्थैर्यचे प्रसन्न रुद्रभटे, मुख्याध्यापक चंद्रकांत फडतरे, समाजसेवक सागर सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

No comments

Powered by Blogger.