लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेसाठी कराडात उपोषण


कराड : कराडमध्ये हिंदू एकता आंदोलन समितीने लव्‍ह जिहाद जनजागृतीसाठी पदयात्रेसाठी उपोषण सुरू केले आहे. पोलिस प्रशासनाने पदयात्रेस परवानगी नाकारल्याने समितीने दत्त चौकात उपोषण करणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता उपोषणार सुरुवात करण्यात आली आहे. 
हिंदू एकता आंदोलन समितीचे प्रांताध्यक्ष तथा कराडचे नगरसेवक विनायक पावसकर, आचार्य जितेंद्रजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात कराडसह जिल्ह्यातील शेकडो युवक सहभागी झाले आहेत. २० आणि २१ जानेवारी अशा दोन दिवशी कराड ते सातारा अशी लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रा काढण्यात येणार होती. मात्र, या पदयात्रेला सातारा पोलिस अधीक्षकांनी परवानगी नाकाल्यानंतर हिंदू एकता आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या पदयात्रेला परवानगी मिळावी, म्हणून हे आंदोलन सुरू केले आहे.भिमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर या पदयात्रेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक शांतता प्रस्थापित झाल्यानंतर काही दिवसांनी पदयात्रेला परवानगी मिळाली, तरी चालेल अशी भूमिका हिंदू एकता आंदोलन समितीने घेतली आहे.

No comments

Powered by Blogger.