दिव्यांग क्षेत्रातील चोरमले कुटुंबीयांचे कार्य समाजाला दिशादर्शी- आ. दीपक चव्हाण


फलटण - दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते अशी लक्षीत नसलेली ही मुले घडावित असताना त्यांना शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करुन देणे. तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानजनक जीवन जगण्याइतपत त्यांना सक्षम बनविणे या ध्येयाने वाटचाल करणारे कृष्णाथ ऊर्फ दादासाहेब चोरमले व वैशाली चोरमले या दांपत्याचा आदर्श अन्य संस्थांसाठी दीपस्तंभाप्रमाणे समाजाला मार्गदर्शक व दिशादर्शी आहे असे प्रतिपादन आ. दीपकराव चव्हाण यांनी केले.

महात्मा शिक्षण संस्था संचलित ठाकुरकी ता. फलटण येथील मूकबधिर विद्यालय येथील वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. या प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सौ. रेश्मा भोसले, डॉ. प्राची जोशी, त्वचारोग तज्ञ डॉ.सौ. दिपा आगवणे, हदयरोग तज्ञ डॉ. सौ. पुनम पिसाळ, सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालक सौ. संध्या गायकवाड, सौ. स्मिता शहा, सौ. निना कोठारी, सौ. पुजा जेठवानी, सौ. रुपाली तारळकर,सौ.वृषाली कणसे, संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णाथ ऊर्फ दादासाहेब चोरमले, फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वैशाली चोरमले आदी प्रमुख मान्यंवर यावेळी उपस्थित होते.

वास्तविक पाहता समाजापासून उपेक्षित व दुर्लक्षित असणारा हा घटक म्हणजेच दिव्यांग मुलांसाठी शासकीय स्तरावर अनेक योजना आहेत, परंतु त्यांचा लाभ संबंधित मुलांपर्यंत पोहचतोच असे नाही. शिक्षणानंतर या मुलांना व्यवसाय अथवा नोकरी संदर्भात अनेक अडचणीचा सामना करावा लागतो अशावेळी शासकीय पातळीवर त्यांना मदत करू व येणार्या अडचणी सोडविण्यासाठी आपणाकडून निश्चित प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देत आ. चव्हाण म्हणाले, या संस्थेस शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नसताना येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळत असलेले शिक्षण, आहार, निवास, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधा उच्चतम दर्जाच्या आहेतच. परंतु शिक्षण झाल्यावर या मुलांना नोकरी अथवा व्यवसाय कसा करता येईल याचेही महत्वपुर्ण मार्गदर्शन व प्रयत्न करुन खर्या अर्थाने या मुलांचे जिवन घडविण्यासाठी होणारा प्रामाणिक प्रयत्न महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चोरमले दापंत्य व शिक्षक यांच्याकडून होत असल्याचे चव्हाण यांनी यावेळी आवर्जुन नमूद केले.

यावेळी बोलताना फलटण पंचायत समितीच्या सभापती सौ. रेश्मा भोसले म्हणाल्या की आयुष्याची बाराखडी सर्वत्र शिकावयास व पहावयास मिळते पण येथे दिव्यांग मुलांना भविष्य घडविण्याची बाराखडी शिकविली जाते. 'मूकम् करोती वाचालम्' या भगवद गितेतील ओळीप्रमाणे ज्यांना बोलता येत नाही व ऐकताही येत नाही त्यांना बोलायला ऐकायला व जगायला शिकवुन त्यांना एक चांगले सक्षम नागरीक म्हणून जगण्याइतपत सबल बनविणार्या या संस्थेला आपले नेहमीच पाठबळ राहिल अशी ग्वाहीही शेवढी पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ऊपस्थित मान्यंवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन जागतिक अपंग दिना निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविकात कृष्णाथ ऊर्फ दादासाहेब चोरमले यांनी केले व थोडक्यात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

सुत्रसंचलन वैशाली शिंदे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका दिप्ती देसाई यांनी मानले.

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व परीसरातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

दीप प्रज्वलन करताना आ. दीपक चव्हाण शेजारी रेश्मा भोसले, डॉ. दिपा आगवणे, डाॅ.पुनम पिसाळ, डॉ. प्राची जोशी, दादासाहेब चोरमले, वैशाली चोरमले, सौ. स्मिता शहा, सौ. पुजा जेठवाणी व अण्य

No comments

Powered by Blogger.