"निमित्त स्नेहमेळाव्याचं अन् एल्गार पाणीप्रश्नाचा" ...आजी माजी विद्यार्थ्यासह ग्रामस्थांचा गाव पाणीदार करण्याचा निर्णय.


पुसेसावळी:खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथे निमित्त ठरलं सन 1993 च्या इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचं आणि यात एक एल्गार झाला तो पाणीप्रश्नाचा. त्याला साथ देत गाव पाणीदार करण्याचा निर्धार करण्यात आला. राजकारणातील एकेकाळचे कट्टर विरोधक धनंजय पाटील व समरजित राजेभोसले आपल्या समर्थकांसह एकत्र आले आणि गावात जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या स्नेहमेळाव्याचे निमित्तानं या 1967 पासूनच्या सुमारे चार हजार माजी विद्यार्थ्यांनी शाळेसह गावात नव्याने सुरू होणाऱ्या पाणी फाउंडेशनला मदत करण्याचे आश्वासन दिले. विकासाच्या मुद्द्यावर सारा गाव एकत्र आला आणि आपलं गाव पाणीदार करण्याचा अभूतपूर्व निर्णय ग्रामसभेद्वारे घेण्यात आला.इतकेच नव्हे तर गावातील प्राथमिक माध्यमिक शाळा सुशोभीकरण करून गाव ही तितकाच सुंदर करण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी घेतला.या गावाला मदत म्हणून स्वामी विवेकानंद संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आर्थिक वाटा उचलण्याचा निर्णय कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केला.एक सामाजिक बांधिलकी म्हणून या गावात ज्ञानदान करणार्‍या सर्व आजी व माजी शिक्षकांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला.त्याचबरोबर सुमारे चारशे रोपांचे वाटप विद्यार्थ्यांना करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली.गट-तट आणि राजकीय संघर्ष यांनी दूषित झालेली मने या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आली.आपला गाव सोडून सासरी गेलेल्या मुली या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.त्यांनीही आपल्या गावासाठी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली.या कार्यक्रमास श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे,सातारा जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ तसेच पंचायत समिती वडूज येथील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच समरजित राजेभोसले होते.या अनोख्या निर्णयामुळे राजाचे कुर्ले गावात सध्या मात्र एकीची भावना वाढीस लागल्याचे चित्र यानिमित्ताने दिसू लागले आहे.
फोटो- मेळाव्यानंतर राजकीय संघर्ष विसरुन पाणी फौंडेशनचा सकारात्मक निर्णय घेताना धनंजय पाटील,सरपंच समरजित राजेभोसले व ग्रामस्थ.

No comments

Powered by Blogger.