देशभरातून आलेल्या लाखो धारकर्यांनी जावळीचे खोरे शहारले, श्री.शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान मोहिमेचा आज रायरेश्वर जांभळी येथे समारोप.


पुसेसावळी:-आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांनी स्थापन केलेल्या, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आयोजित धारतीर्थ यात्रेचा उद्या सकाळी जांभळी, तालुका वाई येथे समारोप होत आहे. समारोपाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर हजर असणार आहेत. संभाजीराव भिडे गुरुजी यांचे मोहिमेच्या समारोपाचे भाषण सर्वात महत्वपूर्ण होणार आहे. श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान प्रत्येक वर्षी धारतीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमांचे आयोजन करत असते, आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाने या मोहिमा पार पडत असतात. या वर्षी श्री. प्रतापगड ते श्री.रायरेश्वर मोहीम आयोजित करण्यात आली होती, दिनांक २६ जानेवारी दुपारी, आई भवानी देवीच्या आरतीने प्रतापगड येथून या वर्षीच्या मोहिमेचा प्रारंभ झाला. सर्वात पुढे टेहेळणी पथक, मग भगवा घेतलेला मानकरी, त्याच्या बरोबर शस्त्रपथक, आणि मागे स्फुर्ती गीते, महाराजांचा जयघोष करत जाणार्या धारकर्यांचा जमाव, असे मोहिमेचे स्वरूप. या मोहिमेसाठी राज्यातूनच न्हवे तर संपूर्ण हिंदुस्थानातून धारकरी सहभागी झाले आहेत. पहिला मुक्काम प्रतापगड पायथा येथे असणाऱ्या पार या गावात झाला. रात्री इतिहासकार पांडुरंगराव बलकवडे यांचे व्याख्यान झाले. धारकरी आपल्या बरोबर आणलेली शिदोरी खाऊन पार येथे मुक्कामी राहिले.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात भल्या पहाटे मोहिमेची सुरुवात झाली, गुरुजींच्या बरोबर सूर्य नमस्कार, जोर बैठका हा व्यायाम झाल्यावर महाबळेश्वर चा भला मोठा डोंगर चढायला मोहीम सरसावली, हजारो-लाखो धारकरी जावळीच्या या खोऱ्यात मागे अश्याच मोहीम रुपात एकत्र आलेले आहेत. या भागातली हि पाचवी सहावी मोहीम. शिस्तबद्ध तरुण डोंगर चढून क्षेत्र महाबळेश्वर येथे मुक्कामी पोचले, येथे इतिहासकार व प्रवचनकार सु.ग.शेवडे यांचे व्याख्यान झाले. आजचा मुक्काम कृष्णा काठी बलकवडे या गावात आहे.
आज कमळगड मार्गे मोहीम श्री रायरेश्वर येथे पोचली मोहिमेचा भंडारा वाटेत वासोळे येथे संपन्न झाला. या वर्षीच्या समारोपाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

चौकट

३२ मण सुवर्ण सिंहासन संकल्प श्री शिवप्रतिष्ठान च्या रायगड येथील कार्यक्रमात मागील वर्षी झाला, त्या नंतर स्वराज्याची शपथ जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली त्या रायरेश्वराच्या आशिर्वादाला उभ्या हिंदुस्थानातून धारकरी आले आहेत. असं गुरुजी म्हणाले, आधी कळस मग पाया अशी आपल्यात म्हण आहे. रायगडावर संकल्प केलेले सिंहासन पूर्ण होण्यास रायरेश्वराचा आशिर्वाद मिळावा, स्वराज्याचे सिंहासन पुनरपी रायगडावर स्थापन व्हावे हिच यावर्षीच्या मोहिमेतील प्रत्येक धारकर्याच्या मनातील इच्छा आहे, आणि त्या साठीच लाखो धारकरी रायरेश्वरला आले आहेत.

चौकट

गुरुजी के दर्शन को आये
या मोहिमेत इयत्ता तिसरी पासून ८५ वर्षांच्या ज्येष्ठां पर्यंत अनेक मावळे येतात. महाबळेश्वर च्या थंडीत देशप्रेमाची उब मिळाली आणि थंडी पळून गेली असं अनेकांनी मत व्यक्त केलं. तर भिडे गुरुजींच कार्य आणि नाव माध्यमातून संपूर्ण भारतात पोचले, त्यांना पहायला. त्यांचे दर्शन घ्यायला दिल्ली चे दोन तरुण मोहिमेत सहभागी झाले आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात या राज्यातून हजारो तरुण मोहिमेत सहभागी झाले आहेत.

चौकट

सातारा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या मार्ग दर्शनात संपूर्ण मोहिमेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला गेला. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीत पोलीस प्रशासनाने आपले कर्तव्य चोख बजावले. सिस्का चे वैशिष्ठ्य पूर्ण पेट्रो मॅक्स दिवे रात्रीच्या अंधारात धारकरी मंडळींना उपयोगी पडले. स्वयं शिस्तीत सुरु असणारी मोहीम पोलीस प्रशासनाला देखील आश्चर्य करून टाकणारी आहे. असे मत अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

No comments

Powered by Blogger.