कराड : दुचाकींच्या धडकेत एक ठार, तीन जखमी


कराड : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर मलकापूर गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक ठार तर तीन जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकजण गंभीर असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवार दि. ३० रोजी रात्री 11.30 वाजता हा अपघात झाला.

पांडुरंग तुकाराम कणसे (वय ४१, रा. जखिणवाडी, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे, तर स्वप्निल प्रकाश कणसे यांच्यासह आणखी दोनजण जखमी आहेत.

No comments

Powered by Blogger.