युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न; ६ जणांवर गुन्हा


सातारा : दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयातून परतत असताना युवती व तिच्या नातेवाइकांसमोर दुचाकी आडवी मारून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवीन सुनील त्रिंबके (रा. मल्हारपेठ) याच्यासह पाच जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा परिसरात एक 22 वर्षीय युवती राहण्यास असून ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी ती महाविद्यालयात गेली होती. सायंकाळी ती महाविद्यालयातून एका नातेवाईकासमवेत दुचाकीवरुन घराकडे परतत होती. तीची दुचाकी त्रिंबके याने स्वत:ची गाडी आडवी मारुन पोवईनाका परिसरात अडवली. युवतीला त्रिंबकेनेे माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशीच लग्न करणार, तुला दुसर्‍याशी लग्न करु देणार नाही, तुला आत्ताच घेवून जाणार, असे म्हणत दमदाटी करत सोबत असणार्‍या गाडीत बसवण्यास सुरुवात केली. यानंतर त्रिंबके व त्याच्या साथीदारांनी युवतीसोबत असणार्‍या नातेवाईकास मारहाण केली. याची तक्रार त्या युवतीने शहर पोलिस ठाण्यात दिली असून नवीन त्रिंबके याच्यासह 5 जणांवर अपरहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

No comments

Powered by Blogger.