धर्मा पाटील यांना न्याय द्‍या, शेतकरी संघटनांचा रास्ता रोको


कराड : धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांना न्याय मिळाला पाहिजे,  या मागणीसाठी स्वाभिमानी आणि बळिराजा या दोन्ही शेतकरी संघटनांनी दोन्ही शेतकरी संघटनांनी सोमवारी कराडमध्ये रास्ता रोको केला. 
गेल्या आठवड्यात २२ जानेवारीला मुंबईत मंत्रालयात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, या मागणीसाठी विषारी औषध प्राशन करून धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ राज्य शासनाचा निषेध नोंदवत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बैलाच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी कराडमध्ये रास्तारोको केला. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, बळिराजाचे सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, 'स्वाभिमानी'चे प्रदीप मोहिते, अनिल घराळ, योगेश झांब्रे यांच्यासह दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाली होते. गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेत राज्य शासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा देत स्वाभिमानी व बळिराजा या दोन्ही शेतकरी संघटनांनी धर्मा पाटील यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

No comments

Powered by Blogger.