किल्ले अजिंक्यताऱ्यावरील वनसंपदेला अज्ञाताने लावली आग


सातारा :- अजिंक्‍यतारा किेंल्‍ल्‍यावरील वनसंपदेला आज अंज्ञातांनी आग लावली. यामुळे किल्‍ल्‍याच्या आजूबाजूला असलेल्‍या वरसंपदेचं या आगीत मोठ नुकसान झालं आहे. या आगीमुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. वनकर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.

अजिंक्‍यतारा किल्‍यावरील परिसर डोंगराचा आणि चढ उताराचा असल्‍याने आग आटोक्‍यात आणताना वन विभागाच्या कर्मचार्‍यांना विशेष परिश्रम करावे लागले. डोंगरावरील सततच्या आगीमुळे पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणात हानी होत असून वन्यजीवांनाही धोका निर्माण होत आहेत. अशा प्रकारे आगी लावुन पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होवु लागली आहे.

No comments

Powered by Blogger.