फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल


सातारा :सैदापूर (ता. सातारा) येथील एका अपार्टमेंंटमधील फ्लॅट खरेदी देण्याच्या बहाण्याने सातार्‍यातील डॉ. सुभाष बळवंत हिरवे यांना 22 लाख 50 हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सातार्‍यातील राधिका रोडवर डॉ. सुभाष हिरवे हे राहण्यास असून त्याच ठिकाणी ते हॉस्पिटल चालवतात. त्यांना सैदापूर (ता. सातारा) येथील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करायचा होता. फ्लॅट पसंत पडल्यानंतर फ्लॅटचा व्यवहार 22 लाख 50 हजार रुपयांना ठरला. व्यवहारापोटी ठरलेली रक्कम दिल्यानंतर डॉ. हिरवे यांनी फ्लॅटचे खरेदीखत करून देण्यासाठी बिल्डरकडे तगादा लावला. तगादा लावूनही डॉ. हिरवे यांना फ्लॅटचे खरेदीखत करून देत नव्हते. खरेदीखत करून देण्याऐवजी डॉ. हिरवे यांनाच बिल्डरकडून वारंवार धमकी दिली जात होती. त्यामुळे डॉ. हिरवे यांनी याची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली. तपास उपनिरीक्षक औटे हे करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.