चौथ्‍या दिवशी 'पद्मावत' १०० कोटींच्‍या जवळ


काही राज्‍यांमध्‍ये पद्मावत चित्रपटांवर बंदी आणूनदेखील चित्रपट चारच दिवसांत ब्‍लॉकबस्‍टर ठरला आहे. 'पद्मावत'ने चार दिवसांत १०० कोटींचा गल्‍ला जमवला आहे. पहिल्‍याच दिवशी चित्रपटाने जबरदस्‍त ओपनिंग केली होती. २४ जानेवारीला पद्मावतने ५ कोटींचा गल्‍ला जमवला होता तर रिलीज झाल्‍यानंतर म्‍हणजेच २५ जानेवारीला १९ कोटी रु.ची कमाई केली होती. २६ जानेवारीला ३२ कोटी तर २७ जानेवारीला 'पद्मावत'ने २७ कोटी रु.चा टप्‍पा ओलांडला. आतापर्यंत 'पद्मावत'ने तब्‍बल ८३ कोटींची जबरदस्‍त कमाई केली आसून हा आकडा शंभरी पार करेल, असे मत चित्रपट समीक्षकांनी व्‍यक्‍त केले आहे. चित्रपटाच्‍या बॉक्‍स ऑफिसवरचे कलेक्‍शन पाहून दीपिका, रणवीर आणि शाहिदने आनंद व्‍यक्‍त करत ट्‍विट केले आहे.

व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी टविट करुन म्‍हटले आहे...'२७ कोटी रु. च्‍या कमाईसोबत पद्मावतसाठी शनिवारी मोठा दिवस ठरला. एकूण ८३ कोटींची कमाई झाली आहे. आता पद्मावत लवकरच १०० कोटी रु. चा आकडा पार करण्‍यास तयार आहे.'

विविध राज्यांतील काही ठिकाणी चित्रपट रिलीज झाला तर बहुतांशी ठिकाणी 'पद्मावत'चे स्क्रिनिंग झाले नाही. तरीदेखील पद्मावत १०० कोटीं रु.पर्यंत पोहोचण्‍यास तयार संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत'मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोन, अभिनेता शाहिद कपूर, अभिनेता रणवीर सिंह यांनी भूमिका साकारल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.