पवारवाडी सरपंचपदी आप्पासाहेब पवार


पवारवाडी: पवारवाडी ता.फलटण येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री.ज्ञानेश्वर आप्पासाहेब पवार यांची बिनविरोध निवड झाली.अनिल विठ्ठलराव जाधव यांनी यांनी आपल्या सरपंचपदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता.या रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी येथील ग्रामपंचायत कार्यालयात विषेश सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सरपंच पदासाठी श्री.ज्ञानेश्वर आप्पासाहेब पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी महेंद्र देवकाते यांनी सरपंचपदी श्री पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.ग्रामसेवक श्री धवडे यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले.

नूतन सरपंच श्री पवार यांचा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,जिल्हा बंकेचे संचालक श्रीमंत दादाराजे खर्डेकर,बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,पंचायत समितीचे उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर,फलटण तालुका दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार व मावळते सरपंच श्री अनिल जाधव,उपसरपंच अनिता पिसाळ,ग्रा.पं.सदस्य हणमंत गावडे,ज्योती निकाळजे,शकीला सय्यद, दत्तात्रय निकाळजे,धनंजय पवार ,सौ वैष्णवी परकाळे यांनी अभिनंदन केले.

नूतन सरपंच श्री पवार म्हणाले,गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन शासनाच्या जास्तीत योजनांचा लाभ मिळवून देत सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

यावेळी प्रदीपदादा वरे,जगदिश परकाळे,किसन जाधव,गोरख पवार,मारूती गावडे,संजय निकाळजे,वैभव देशपांडे,सुरेश पवार,मारुती जाधव रामदास गावडे,चंद्रहार पिसाळ अंबादास कदम,राजेंद्र तावरे,शरद मुळीक आदींसह ग्रामस्थांनी सरपंच ज्ञानेश्वर पवार यांचे अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.