वाडयात बसून पत्रके काढू नका : आ. शंभूराज देसाई


सणबूर : चिरेबंदी वाडयात बसून माजी आमदार आणि त्यांचे सुपूत्र माझ्यावर आरोप करीत आहेत. सत्यजितसिंह पाटणकरांना माझी धमक आणि माझे कतृत्व पहायचे असेल तर त्यांनी त्यांच्या चिरेबंदी वाडयातून बाहेर पडून जनतेसमोर बोलावे. तालुक्यातील जनताच त्यांना याचे उत्तर देईल, असा टोला आ. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांना कार्यक्रमातून लगाविला आहे.

आंब्रळे ढोपरेवाडी (ता. पाटण) येथे कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून मंजूर झालेल्या आंब्रुळे ते ढोपरेवाडी रस्त्याचे भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील, सरपंच दिलीप पाटीले यांची उपस्थिती होती.

आ. देसाई म्हणाले, पाटणकर पिता-पुत्रांना माझे जाहीरपणे आव्हान आहे, त्यांनी माझेवर आरोप करताना किंवा मी केलेल्या वक्तव्यावर बोलताना चिरेबंदी वाडयात न बसता जनतेसमोर येवून बोलावे. परंतु या दोघांना जनतेसमोर येण्यास आणि त्यांना काही देण्यास काहीच नसल्याने ते जनतेसमोर कसे येणार? माजी आमदारांनी तालुक्यातील जनतेला काही दिले नाही. चांगला चाललेला कारखाना अडचणीत कसा येईल आणि तो कसा आणता येईल हाच पारंपारिक उद्योग यांचा सुरु आहे.

कारखान्याच्या सभासद, शेतक-यांच्या भक्कम विश्‍वासामुळे आम्ही कारखाना चांगला चालवित आहे. हे या पितापुत्रांना पहावत नसल्याने उठसुट कारखान्यावर बोलायचे. कारखान्याची मापे काढण्यापेक्षा पाटणकर पितापुत्रांनी जाहीर केलेल्या कोयना शुगर कारखान्याची वीट कधी उभी राहणार हे सांगा. देसाई कारखान्याच्या सभासंदानी तुम्हाला अनेकदा नाकारले आहे. या कारखान्यात आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यानंतरच तुम्ही कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना घालण्याची दुकाने थाटुन बसला आहात.

No comments

Powered by Blogger.