जिल्ह्याची साथ मिळत नाहीच हिच मोठी शोकांतिका...! - ना.महादेवराव जानकर


बिजवडी - २७ वर्षापूर्वी मी म्हटलो होतो एक दिवस राज्याचा व देशाचा नेता होईन आज ते करून दाखवले आहे. सातारा जिल्ह्यावर मी आईसारखे प्रेम करतोय मात्र मातृभूमी व कर्मभूमीतूनच मला साथ मिळत नाही.आज मला मराठवाडा ,विदर्भच्या जनतेच्याने नेता बनवलेय.मात्र जिल्ह्याची साथ मिळत नाही हीच मोठी शोकांतिका असल्याची खंत पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना.महादेवराव जानकर यांनी केले आहे.

दहिवडी ता.माण येथील बाजार पटांगणावर पश्चिम महाराष्ट्र आयोजित भव्य राष्ट्रीय समाज पक्षाचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार राहूल कूल ,रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.एस.अक्कीसागर ,प्रदेश महासचीव बाळासाहेब दोलतडे ,प्रदेशा उपाध्यक्ष दादासाहेब केसकर ,अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष ताजुद्दीन मणेर ,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष श्रध्दाताई भातंबेकर ,प्रदेश सचिव डॉ.उज्वलाताई हाके ,राज्य कार्यकारणी सदस्य बबनदादा विरकर ,भाऊसाहेब वाघ ,नितीन धायगुडे ,प.महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांडगे - पाटील ,सरचिटणीस आण्णासाहेब रूपनवर ,जिल्हा नियोजन सदस्य काशिनाथ शेवते ,संपर्कप्रमुख खंडेराव सरक ,प्रा.शिवाजीराव महानवर ,डॉ.प्रमोद गावडे ,सौ.पूजाताई घाडगे आदी प्रमुख मान्यवर ,पदाधिकारी ,कार्यकर्ते व शेतकरीबांधव उपस्थित होते.

ना.महादेवराव जानकर म्हणाले , स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांचे उपकार म्हणून भाजपाने रासपला सत्तेत घेतले असून विरोधकांनी भाजपा-शिवसेना -रासपा व इतर ही युती तुटावी म्हणून पाण्यात देव घातले आहेत पण हा महादेव जानकर युती तुटून देणार नाही.बारामती व माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष कपबशीच्या चिन्हावर लढणार असून आपणही बारामती लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जे लोक तुमचे हक्काचे पाणी पळतायत त्यांना तुम्ही साथ देताय यापेक्षा मोठे दुर्भाग्य कोणते.मला तुम्ही साथ नाही दिली तरीही आपल्या भागाचा विकास व्हावा या हेतूने मी नैतिकतेतून प्रयत्न करतोय.शेतकरी मेळाळ्याच्या माध्यमातून माणला येण्याची संधी मिळाली त्यामुळे मामूशेठ व त्यांच्या सहकाऱ्यांच अभिनंदन. ते म्हणाले मिशन पश्चिम महाराष्ट्र यशस्वी करायचे असेल तर पक्षवाढी बरोबरच संघटन , वार्ड , गण , गटनिहाय काम करणे गरजेचे आहे.आपली पार्टी राज्यात पाच नंबरची पार्टी बनली असून अजूनही ताकद वाढवणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांनी मानसिकता बदलत करत विश्वास ठेवावा यश निश्चीतच मिळेल.

माण तालुक्यात स्व.पोळ तात्यांच्या आशीर्वादावर बबनदादांच्या ताकदीवर व रासपच्या चिन्हावर पंचायत समिती सदस्य निवडून आल्या आहेत.भाजपच्या कोट्यातून लवकरच मंत्रीपदाच्या दर्जाची दोन महामंडळे मिळणार असून आमदार राहूल कूल व बाळासाहेब दोलतडे यांना संधी देण्यात येणार आहे. या शासनाने

शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणल्या असून मत्सबीज ,गायी पालन ,कुकुटपालन आदी योजनांतून शेतकऱ्यांनी उद्योगपती व्हावे.दूधाचे दर आपण सात रूपयाने वाढवले असून शेतकऱ्याला दूध डेअरीवाल्याने २५ रूपयाच्याखाली दर दिला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.शेतकऱ्याच्या हिताचे नाटक करून आमच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे मात्र जेवढा तुम्ही हल्ला कराल तेवढी जनता आमच्याबरोबर असेल असेही त्यांनी सांगितले.माणच्या जनतेने मला कधीही आपल मानल नाही.मी अजूनही या जनतेकडे याचना करतो की रासपला साथ द्या माण-खटावचा आमदार रासपचाच निवडून आणू असेही शेवटी त्यांनी आवाहन केले.

आमदार राहूल कूल म्हणाले,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून आपल्या पक्षाची ताकद वाढवून जानकर साहेबांना साथ देण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.

बाळासाहेब दोडतले म्हणाले ,जानकर साहेबांसारखा युगपुरूष या मातीत जन्मला आहे.माझा शेतकरी उद्योगपती झाला पाहिजे यासाठी ते विविध योजना मार्गी लावत आहे.गाई,शेळ्या मेंढ्यासाठी विशेष पँकेज देण्याबरोबरच मागेल त्याला कुकुटपालनसारख्या योजना देण्यासाठी तसेच शेततळे देऊन मत्सबीजासाठी प्रोत्साहन देण्याचेही कार्य ते करताना दिसून येत आहेत.येणाऱ्या निवडणूकात मिशन निवडणूकीमध्ये ५० आमदार व ५ खासदार निवडून आणण्याचे मिशन नियोजित करण्यात आले आहे.यासाठी आतापासूनच आपण सर्वांनी कामाला लागावे असेही त्यांनी सांगितले.

रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर प्रास्ताविकात म्हणाले,मंत्री महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदार संघातून लढावे.सहकारी दूध संघ नव्याने स्थापन करावेत.दुधाला १९ रुपये हमी भाव होता.तो वाढवून २७ रुपये केल्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

सूत्रसंचालन वैभव विरकर यांनी करून आभार जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब आटपाडकर यांनी मानले.
चौकट - दहिवडीत दुपारच्या दरम्यान ऐन ऊन्हात कार्यक्रम सुरू असल्याने शेतकरी व कार्यकर्तेबांधव ऊन्हात बसल्याचे पाहून मंत्री महादेवराव जानकर यांनीही भर ऊन्हात कार्यकर्त्यांत बसणे पसंत करत आपले जमिनीवर पाय असल्याचे दाखवून दिले.

No comments

Powered by Blogger.