महिलेची फोनद्वारे फसवणूक

 

पाचगणी  : - पाचगणी येथील एका महिलेला फोनवरून बँकेत ऑनलाइन विम्याचे पैसे भरण्यास सांगून गंडा घातल्याची घटना घडली. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की संबंधित महिलेला फोनवरून तुमच्या विम्याचा हप्ता भरावयाचा बाकी असून तो तुम्ही मी दिलेल्या नंबरवर भरा म्हणजे तुम्हाला १० हजार रुपये डिसकाउंट मिळेल. असा दोन तीन वेळा फोन आल्याने संबंधितांनी आपल्या बँक खात्यातून दिलेल्या खाते नंबरवर ९० हजार रुपयांची ऐन ई एफ टी केली.

पैसे भरले नंतर दुसरे दिवशी त्यांनी आपल्या विमा खात्यावर खात्री केली असता ते पैसे आपल्या खात्यावर जमाच झाले नसल्याचे निदर्शनास आले. आपली पूर्ण फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने फसवणूक झालेल्या अमिता नानासाहेब दगडे रा.शाहूनगर पांचगणी यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

या घटनेचा अधिक तपास महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे व पांचगणी पोलीस ठाण्याच्या साहायक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.