जावलीचा एअरटेल टाॅवर बाबत तीव्र नाराजी


जावली : जावली ता फलटण येथील एअरटेल चा टाॅवर गत महिनाभरा पासुन इंटरनेट सुविधा चांगल्या प्रकारे पुरविण्यात येत नसल्याने एअरटेल ग्राहकां मधुन तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.जावली परिसरात मोठ्या प्रमाणावर एअरटेल ग्राहक आहेत. अनेकांनी एअरटेल च्या विविध पॅकेज चा लाभ घेतला आहे मात्र इंटरनेटची सुविधा व्यवस्थित पुरवण्यात येत नसल्याने ग्राहकांची मोठी कुचंबणा होत आहे. सध्या इंटरनेटच्या माध्यमातून विविध रिचार्ज विविध माहिती तसेच बँकिंग आदी सुविधा ग्रामीण भागात मिळत आहेत. मात्र जावली च्या एअरटेल टाॅवर च्या माध्यमातून इंटरनेट सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे संबंधितांनी याकडे लक्ष घालुन यामध्ये सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.